Ad will apear here
Next
‘देशाच्या आर्थिक वृद्धीला शहरीकरणामुळे चालना’
अमिताभ कांत यांचे मत

दावोस : ‘भारताच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी शहरीकरण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या पायाभूत सुविधा, आर्थिक सुधारणा यांचा यामध्ये मोठा वाटा आहे,’ असे मत नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी बुधवारी (२३ जानेवारी २०१९) दावोस येथे व्यक्त केले. जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीदरम्यान एका कार्यक्रमात ते बोलत होते.  

नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत
‘जागतिक नाणेनिधीने, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती फार चांगली नसतानादेखील भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्के दराने वाढेल, असे भाकीत केले आहे; मात्र भारतीय अर्थव्यवस्था त्यापेक्षा सरस कामगिरी नोंदवेल अशी अपेक्षा आहे,’ असेही कांत यांनी नमूद केले. 

‘भारतातील शहरीकरणाला १०० स्मार्टसिटीज विकसित करण्याच्या प्रकल्पामुळे मोठी गती मिळाली आहे. देशात व्यापार आणि प्रशासकीय पातळीवर तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पायाभूत सुविधांची प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगाने उभारणी करण्यात येत आहे. महागाई, आर्थिक तूट या बाबीदेखील सकारात्मक होत आहेत,’ असेही कांत यांनी स्पष्ट केले. 

या वेळी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांच्यासह अनेक भारतीय आणि परदेशी कंपन्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 


‘गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांराज्यामध्ये स्पर्धा सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनीदेखील ही आर्थिक सुधारणांची प्रक्रिया स्वीकारली आहे. व्यवसाय सुलभता, थेट परदेशी गुंतवणूक, उत्पादन आणि करआकारणी आदी क्षेत्रांसह अनेकविध क्षेत्रांमध्ये सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत,’ असे व्यवसाय धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी सांगितले.

व्यवसाय सुलभता, कर आकारणी याबाबतीत अद्यापही काही अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यावर, त्याला उत्तर देताना अभिषेक म्हणाले, ‘याबाबतीतल्या अडचणी दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. स्टार्टअप्स आणि एंजल इन्व्हेस्टर्ससाठी विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत.’

‘गतिमान निर्णय प्रक्रियेसाठी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि आंतरविभागीय प्रक्रियांमधील मानवी हस्तक्षेप दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व प्रक्रिया डिजिटल करण्यात येत आहेत,’ असे अमिताभ कांत यांनी स्पष्ट केले.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZJKBW
Similar Posts
सौदी अरेबियाची गुंतवणूक वाढावी यासाठी ‘इंडिया इन्व्हेस्ट ग्रिड’ची स्थापना नवी दिल्ली : सौदी अरेबियाची भारतातील गुंतवणूक वाढवण्यासाठी ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची स्थापना करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या नीती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या भेटीत ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची घोषणा करण्यात आली.
एनईएफटी, आरटीजीएस होणार निःशुल्क; रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात आणि रिव्हर्स रेपो दरात प्रत्येकी पाव टक्का कपात केली असून, एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्कही रद्द केले आहे. आता नवा रेपो दर ५.७५ टक्के असून, नवा रिव्हर्स रेपो दर ५.५० टक्के झाला आहे. यामुळे बँका गृहकर्जांचे व्याजदर घटवण्याची अपेक्षा आहे
शेती सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम मुंबई : ‘शेतीतील सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात अन्य राज्यांच्या तुलनेत विविध निकषांवर ८१ टक्के गुण मिळवून आघाडीवर आहे,’ असे प्रशस्तिपत्र निती आयोगाने दिले आहे. भारतीय लोकप्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यशवंतराव
अर्थव्यवस्थेचा विकासदर गाठणार तीन वर्षांचा उच्चांक नवी दिल्ली : उत्पादन, कृषी आणि बांधकाम क्षेत्रातील तेजीमुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागाने (सीएसओ) वर्तवला आहे. तेवढी पातळी गाठल्यास हा विकासदर गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक असेल.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language